30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यात ३१४ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यात ३१४ प्रकरणे निकाली

0
25
  • १ कोटी २३ लक्ष रुपये रक्कमेचे निवाडे पारित

वाशिमदि. १६ : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर होते.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, न्यायिक अधिकारी डॉ. रचना आर. तेहरा, एस. पी. शिंदे, स्वाती फुलबांधे, पी. एस. नेरकर, डॉ. यु. टी. मुसळे, जी. बी. जानकर, एम. एस. पौळ, एस. पी. बुंदे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुधीर डी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. बिलोलीकर म्हणाले, पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होवून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने व आपापसात सामंजस्याने निकाली काढावीत. त्यामुळे पैसा व वेळेची बचत होण्यास मदत होईल.  श्री. मोरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.जिल्हा व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबित अशी एकूण ४३८१ प्रकरणे सुनावणीस ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच १ कोटी २३ लक्ष १५ हजार ६१३ रुपयांचे निवाडे पारित करण्यात आले. लोक अदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, वकील संघ, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.