32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ ऑटो-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या जिल्हास्तरीय मेळावा २२ रोजी

ऑटो-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या जिल्हास्तरीय मेळावा २२ रोजी

0
27

गोंदिया,दि.20 : गोंदिया जिल्हा ऑटो/टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या जिल्हास्तरीय मेळावा रविवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गुर्जर क्षत्रीय समाजवाडी गुरूद्वाराच्या समोर, रेलटोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. गोपालदास अग्रवाल राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ फेडरेशनचे अध्यक्ष विलासराव भालेकर, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगरसेवक पंकज यादव, घनश्याम पानतवने, दुर्गाप्रसाद ठाकरे व सदस्य ललित बानासुरे, सुरेश डोंगरवार, हितेश गजभिये, रजनिश गजभिये, गोपाल मेर्शाम, किशोर ऊके, धापेवाडा सचिव पटले आदी उपस्थित राहणार आहेत. या जिल्हास्तरीय मेळाव्याला सर्व ऑटो/टॅक्सी चालक-मालक व सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आहवान आयोजकांनी केले आहे