27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय बसपाच्या तिन्ही नगसेवकांचा शिवसेनेशी काहीच संबंध नाही!

बसपाच्या तिन्ही नगसेवकांचा शिवसेनेशी काहीच संबंध नाही!

0
28

बसपा नगरसेवकांनी दिली प्रसिद्धीपत्रकातून माहिती
गोंदिया दि.२०: शिवसनेत नुकतेच बसपाचे जिल्हा प्रभारी तथा नगरसेवक पंकज यादव  हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनात अडकले. मात्र, त्यांची पत्नी ललिता यादव व त्यांचे  भाऊ लोकेश यादव हे बसपाच्या तिकीटावर नगर परिषदेची निवडणुक जिंकली होती.तर पंकज यादव हे बसपाच्या तिकीटावर निवडून न येता बसपाच्या पाठिंब्यावर स्विकृत नगसेवक बनले होते. मात्र, आता त्यांचा बसपाशी संबंध नसून बसपाचे तिन्ही नगरसेवक हे बसपातच असल्याचे आणि जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी बसपाचे पाचही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे येत असलेले वृत्त असल्याचे बसपाचे युवा नगरसेवक संकल्प खोब्रागडे, जोत्सना मेश्राम,गौसियाबेग शेख यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
विधानसभा निवडणुकीला घेऊन विविध पक्षात नेत्यांचे येणे जाणे सुरु असून त्याच कळीत गोंदिया जिल्हा बसपाचे जिल्हा प्रभारी पंकज यादव यांनी विधानसभेची तिकीट मिळविण्यासाठी बसपाच्या हतीवर सवार न होण्याचा निर्णय  घेत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला. व त्यांनी मुंबईत शिवसेनेते सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतले. मात्र, त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने बसपामध्ये खळबळ माजली होती. कारण पहिल्यादांच गोंदिया नगर परिषदेमध्ये बसपाचे पाच नगरसेवक निवडून आले होते. तर पंकज यादव हे स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागली होती. त्यामुळे संख्याबळाच्या बाबतीत सहा नगरसेवक गोंदिया नगर परिषदेत बसपाचे होते. आता पंकज यादव शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचा काहीही संबंध बसपाशी राहिलेला नाही. परंतु त्यांचे भाऊ लोकेश यादव व पत्नी ललिता यादव ह्या बसपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत त्या शिवसेनेत आहेत की, बसपात आहेत. याचा खुलासा बसपाचे जिल्हाध्यक्ष धु्रवास भोयर यांचेकडे केलेला नाही. त्यामुळे त्यांचा प्रकरण तळ्यात की मळ्यात ? असे सुरू आहे. कारण ज्यावेळी लोकेश यादव हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांचेसोबत मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते.त्यावेळी ज्या फोटो व्हायरल झाल्या त्यात उद्धव ठाकरे हे लोकेश यादव यांना शिवबंधन बांधतांना दिसत आहेत. त्यामुळे बसपाचे पाचही नगरसेवक शिवसेनेत तर गेले नाहीत ना? अशी शंका बसपाच्या कार्यकर्त्यासमोर निर्माण झाली होती. तेव्हा ही शंका बसपाच्या सर्व कार्यकर्त्यांची दूर करण्यासाठी बसपाचे जिल्हाध्यक्ष धु्रवास भोयर  व बसपाचे नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून बसपाच्या नगरसेवकांचा शिवसेनेशी काहीही संबंध नसून, आम्ही सर्व बसपातच असल्याचे म्हटले आहे. तसेच जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा बसपा स्वबळावर लढणार असल्याचीही माहिती बसपाचे प्रदेश सचिव दिनेशसिंग गेडाम,  जिल्हाध्यक्ष धु्रवास भोयर, नगसेवक जोत्सना मेश्राम, संकल्प खोब्रागडे, गौसियाबाजी शेख, महासचिव कमल हटवार, अरूण गजभिये, नुरलाल ऊके यांनी दिली.