मुंबई,दि.21(वृत्तसंस्था)ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे. दिवाळीच्या आधीच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने दिवाळीआधी विजयाचे फटाके कोण फोडतो हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या 54 मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभारतील. त्यामध्ये 29 जागा अनुसूचित जातींसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे 54 मतदारसंघातील उमेदवार हे आरक्षणाचा आधार घेत निवडणूक लढवणार आहेत.
SC, ST साठी महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ
SC -भुसावळ, मेहकर, मूर्तिजापूर,वाशिम,दर्यापूर,उमरेड,नागपूरउत्तर,भंडारा,अर्जुनी मोरगाव,चंद्रपूर,उमरखेड,देगलूर,बदनापूर,औरंगाबाद पश्चिम,देवळाली,अंबरनाथ,कुर्ला,धारावी,पिंपरी,पुणे कॅन्टोन्मेंट,श्रीरामपूर,केज,उदगीर,उमरगा,मोहोळ,माळशिरस,फलटण,हातकणंगले,मिरज.
ST-क्कलकुवा,शहादा,नंदुरबार,नवापूर,साक्री,शिरपूर,चोपडा,मेळघाट,आमगाव,आरमोरी,गडचिरोली,अहेरी,राळेगाव,अार्णी,बागलाण,कळवण,दिंडोरी,इगतपुरी,डहाणू,विक्रमगड,पालघर,बोईसर,भिवंडी ग्रामीण,शहापूर,अकोले (जि. अहमदनगर)





