
शेगांव,दि.२१:श्री.गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष नारायणराव यादवराव गणेशपाटील यांचे दिर्घ आजाराने (दि.२१ सप्टेंबर)निधन झाले.त्यांची अंतिम यात्रा शनिवारी दुपारी ४ वा. त्यांचे निवासस्थान गजानन सोसायटी येथून निघुन स्थानिक वैकुंठ धाम येथे शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अग्निसंस्कार करण्यात आले.त्यांचे अंतिम यात्रेत संस्थांचे सर्व विसवस्त मंडळ, प्रतिष्ठित नागरिक तथा पंचक्रोशीतल नागरीकांचा सहभाग होता.
मृत्यू समई त्यांचे वय ७९ वर्षे होते .त्यांचे पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंड, पत्नी असा आप्त परिवार आहे.नारायणराव गणेश (पाटील) हे खामगाव व शेगांव पंचायत समितीमधून सन १९९९ मध्ये अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाल्या नंतर दि.१० ऑगस्ट २००० साली ग.म.संस्थान मध्ये त्यांची विसवस्त म्हणून नेमणूक करण्यात आली. तर सन २०१७ मध्ये त्यांची संस्थांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.




