
आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; जिल्हयात एकुण 10 लक्ष 96 हजार 441 मतदार
गोंदिया,दि.२१:: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता आज(दि.21)भारतीय निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहिर केला असून राज्यासह जिल्ह्यातही निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाल्याने सर्व शासकीय कार्यालयासंह जनतेने आदर्श आचारसंहितेची प्रभावी अमलंबजावणीसाठी सहकार्य करावे.तसेच येत्या 21 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी अधिकाधिक संख्येत सहभागी होत मताधिकाराचा वापर करावा अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी पत्रपरिषदेत दिली.सदर पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी महेन्द्र पवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपअधिक्षक पोलिस (गृह) सोनाली कदम, नायाब तहसिलदार आर.एस पटले, हरिशचंद्र मडावी आदि उपस्थित होते.
जिल्हयातील ४ विधानसभा क्षेत्रात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतगणना होऊन निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे.त्यासोबतच 27 ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची सर्व प्रकिया पार पडणार आहे.या निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया,आमगाव,अर्जुनी मोरगाव व तिरोडा या ४ विधानसभा मतदारस़घांत १० लाख ९६ हजार ४४१ मतदार मताधिकाराचा हक्क बजावणार आहेत.त्यामध्ये सैन्यदलातील १७९२ मतदारांचा समावेश आहे.2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ७२ हजार ५४६ मतदारांची वाढ झाली आहे.जिल्ह्यात ५ लाख ४४ हजार ६१९ पुरुष तर ५ लाख ५१ हजार ८२० महिला मतदारांचा समावेश आहे.4081 दिव्यांग मतदार जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी दिली. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सूचनांची माहिती देऊन आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कारणासाठी केला जाणार नसल्याचे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची सूचना सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देण्यात आली आहे. त्याबाबत कार्यवाही सुद्धा करण्यात येत आहे. जिल्हयातील संवेदन व अतिसंवेदनशील मतदान केन्द्रांवर सुरक्षेच्या द्रष्टीने पोलिस विभागाची नजर आहे. तसेच मद्य विक्री तथा अवैद्य मद्य विक्रवर संबंधित विभागाचे लक्ष्य असून आदर्श आचारसंहितेचा भंग होईल असे कृती कोण्त्याही शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्या कडूण होता कामा नये असे निर्देश नोडल अधिकारी यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारांना निवडणुक कालावधी दरम्यान प्रत्येकी 28 लक्ष रुपये खर्च करता येईल तसेच त्यापैकी नकद 10 हजारच्यावर खर्च करता येणार नाही म्हणुन निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यसाठी निवडणूक खर्च सनियंत्रण समिती तसेच प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व सिनियंत्रण समितीसह इतर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज असून आगामी निवडणूका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यात येईल. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेयर व त्यांच्या मांगणीनूसार इतर सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच नागरीकांच्या विविध प्रश्न व शंका असल्यास 1950@ या टोल फ्री क्रमांकावर तथा अधिक माहितीसाठी www.nvsp.in तसेच www.ceo.maharashtra.govt.in या सांकेतीक स्थळावर भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी केले आहे.
नागरीकांच्या तक्रारी साठी मोबाईल सी-व्हीजील ऍप
या निवडणूकीत नागरीकांना निवडणूकी संदर्भात तक्रारीसाठी सीव्हीजील (cVIGIL) या नावाने एंड्राईड मोबाईल ऍप लाँच करण्यात आली आहे. सदर एप्लीकेशन मध्ये नोंदणी करुन तक्रारदार हे लाईव्ह व्हिडीयो तथा फोटो अपलोड करुन तक्रार करु शकतात. प्राप्त तक्रारी नंतर 100 मि. मध्ये कायर्वाही करण्यात येईल. तसेच तक्रारीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची सूचना वेळो-वेळी तक्रारदारास देण्यात येईल. नागरीकांच्या नावे गुप्त ठेवण्यासाठी सदर ऍपमध्ये सुविधा देण्यात आली आहे.
जिल्हयात 1281 मतदान केन्द्र व सेनादलातील 1792 मतदार
जिल्हयातील चार विधानसभा मतदार संघात एकुण 1281 मतदान केन्द्र असून गोंदिया विधानसभा मतदार संघातील खमारी येथे जि.प. केन्द्र प्राथमिक कन्या शाळा, खमारी येथे खोली क्र. 2 मध्ये एक सहाय्यकारी मतदान केन्द्र तयार करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे जिल्हयात चारही विधानसभा क्षेत्रात सेनादलातील एकुण 1792 मतदार आहेत.
गोंदिया मतदारसंघातील ३ मतदान केंद्रात बदल,
गोंदिया मतदारसंघात १ मतदान केंद्र खमारी येथे वाढले
दिव्यांग मतदाराला मतदान के़द्रावर जाण्यासाठी व्यवस्था होणार
एकून मतदार केंद्र- १२८२(अर्जुनी मोर ३१६ केंद्र,तिरोडा २९५ केंद्र,गोंदिया ३६१ केंद्र व आमगाव ३१० केंद्र)
निवडणुक प्रकियासाठी लागणारे कर्मचारी- ५६३६
१७०४ कंट्रोल युनिट ,२३८९ बलेट युनिट,व्हीवीपीटी १७०८




