38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ उच्च पदावर पोचण्याचे ध्येय मनाशी बाळगा-मनोहरराव चंद्रिकापुरे

उच्च पदावर पोचण्याचे ध्येय मनाशी बाळगा-मनोहरराव चंद्रिकापुरे

0
36

अर्जुनी मोरगाव,दि.23ः- विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर मोठे ध्येय समोर ठेवून जोपर्यंत आपल्या हाती यश येत नाही,तोपर्यंत ध्येयाचा पाठलाग केल्यास नक्की यशस्वी होता येते.यासाठी विद्यार्थ्यांनी  कठोर परिश्रम,जिद्द चिकाटी हे गुण आत्मसात अंगिकारणे महत्वाचे असल्याचे विचार माजी जिल्हा कृषी अधिकारी मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी उदघाटक म्हणून व्यक्त केले.ते तालुक्यातील इटखेडा येथे युवाशक्त ग्रामीण बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.पुढे म्हणाले की परिचर होण्यापेक्षा आपण अधिकारी कसे होऊ याचा विचार मनात पक्का करुन अभ्यासक्रम निवडा आणि त्या मागावर चाला असे म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य आशाताई झिल्पे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून एफआरटी शहा, उद्धव मेहंदळे इंद्रदास झिल्पे,संतोष रोकडे व इतर मान्यवर उपस्थित होते. युवाशक्ती बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ गेल्या दहा वर्षापासून जिल्हा परिषद शाळा विसापूर, जिल्हा परिषद शाळा इटखेडा, स्वामी विवेकानंद विद्यालय तथा इसापूर इटखेडा हायस्कूल या शाळेतून वर्ग 1 ते बारावीपर्यंतच्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी केला जातो.संचालन किशोर कावळे यांनी केले.

blank