
गंगापूर:महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले तथा महाराष्ट्र शासन गृहविभाग समिती सदस्य यांच्या हस्ते गंगापूर तालुक्यातील प्रसिध्द मराठी साहित्यिक,कथा पटकथा लेखक तथा गीतकार,संगीतकार योगेश मोरे यांची गंगापूर पोलीस बॉईज संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपञ देण्यात आले.योगेश मोरे यांनी केलेल्या निर्भीड कामाची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली असून,कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु बागडे,पुनमचंद सलामपुरे,रामेश्वर दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच गंगापूर तालुक्यातील नगराध्यक्षा वंदना पाटील,नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील,अनंता कुमावत, योगेश शेळके,भाऊसाहेब शेळके, संकेत मैरळ,महेश मोरे,विकास शिंदे,दादासाहेब जाधव,राजू नांदे,बाबासाहेब नांदे,मयूर जेऊघाले, वैभव पाटील,चंद्रशेखर पाटील,नंदकिशोर पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केलेले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.




