38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News माजी मंत्री अहिरांच्या ताफ्याला अपघात,दोन ठार-तीन जखमी

माजी मंत्री अहिरांच्या ताफ्याला अपघात,दोन ठार-तीन जखमी

0
26

चंद्रपूर दि.२६ : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहीर यांच्या ताफ्यातील वाहनाला आज चंद्रपूर-नागपूर मार्गावर जामनजीक सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना सकाळी घडली.या अपघातात अहीर मात्र सुखरुप बचावले आहेत.असून 3 सुरक्षा जवान गंभीर जखमी झाले आहे.आज सकाळी 7:30 वाजता अहिर हे दिल्ली जाण्याकरिता नागपूर विमातळावर पोहोचण्याकरिता चंद्रपूर निवासस्थानाहून निघाले असताना, जाम च्या काही किलोमीटर आधी त्यांच्या ताफ्यामधील सीआरपीएफ सुरक्षा रक्षकांच्या गाडीला एका अनियंत्रित मालवाहक ट्रकने धडक दिली. यामध्ये 3 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.मात्र अहिर हे समोरच्या गाडीत असल्याने ते सुखरूप आहे. अपघात होताच अहिर यांनी तात्काळ गंभीर जखमी सुरक्षारक्षकांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल केले.

blank