
गोंदिया,दि.28 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली जलाराम मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.त्यामध्ये शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी हा ठराव पारित करण्यात आला.सभेला 800च्या जवळपास सभासद उपस्थित होते.
सभेला माजी आ. दिलीप बंसोड, नरेश माहेश्वरी, उषा मेंढे, अविनाश जैन, महेशकुमार जैन, प्रफुल्ल अग्रवाल, घनश्याम मस्करे, भेरसिंग नागपुरे, अशोक गुप्ता, रामलाल राऊत, भोजराज रहेले, रेखलाल टेंभरे, केवलराम पुस्तोडे, राजकुमार जैन आदी पदाधिकारी व संचालकांसह संस्थेचे जिल्ह्यातील मोठय़ा संख्येत प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला १५ व्या वार्षिक आमसभेचे कार्यवृत्त कायम करून संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २0१८-१९ चा अहवाल स्वीकारण्यात आला. तसेच २0१९-२0 च्या उत्पन्न व खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जैन यांनी बँकेला यंदा ८ कोटींपेक्षा जास्त नफा झाला असून, बँकेला लेखा परीक्षकांनी ऑडिटचा ‘अ’ वर्ग प्रदान केल्याचे सांगितले. सभेला गजानन परशुरामकर, प्रिया हरिणखेडे, राजेश व्यास, सुभाष आकरे, जगदीशप्रसाद अग्रवाल,गंगाधर परशुरामकर, अण्णा डोंगरवार,चिंतामण रहागंडाले,रमेश ताराम,तिर्थराज हरिणखेडे,प्रभाकर दोनोडे, आदी उपस्थित होते.




