भंडारा,दि. 28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून शिवा श्रीनिवास हे भंडारा येथे दाखल झाले आहेत. 27 सप्टेंबरला त्यांचे आगमन झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ उपस्थित होते.निवडणूक खर्च निरिक्षक शिवा श्रीनिवास यांनी तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील निवडणूकीचा आढावा घेतला. ते जिल्हयातील तीनही विधानसभा क्षेत्रातील निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवतील. विधानसभा निवडणूक खर्चाबाबत तक्रार किंवा सूचना असल्यास नागरिकांनी भ्रमणध्वनी क्रंमाक 8600453601 यावर संपर्क साधावा.




