
गोंदिया,दि.३०ः गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल हे आज(दि.३०) नागपूरातील विदर्भ प्रदेश भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,पंचायत समिती सभापती,बाजार समिती सभापती उपसभापतीसंह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.पक्ष प्रवेशासाठी गोंदियातून हजारो कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने निघाले आहेत.गोंदिया विधानसभा मतदारसंघात २७ वर्ष राजकारण करणारे काँग्रेसचे जिल्ह्यातील तारणहार म्हणून अग्रवालांची ओळख आहे.गोंदिया पंचायत समितीसह गोंदिया बाजार समिती,नगर परिषदेतील नगरसेवक व गोंदिया विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य,सरपंच सर्व त्यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांना आ.अग्रवालांनी आपण काँग्रेस सोडत असल्याचे शनिवारलाच सांगितले.त्यानंतर आज रविवारला प्रताप लान येथे समर्थकांची बैठक घेत त्यांनी भाजप प्रवेश करायचे आहे आपण सर्व जाण्यासाठी तयार रहावे अशी सुचना दिली .गेल्या अनेक दिवसापासून अग्रवाल भाजपमध्ये जाणार ही चर्चा असून राजकारण तापले आहे.भाजपमध्येही अग्रवालांच्या प्रवेशाचे स्पष्ट संकेत आले आहेत.रतीय जनता पक्षात प्रवेश करणार दिली.जिल्हा परिषदेत मात्र सत्ताबद्दल होणार आहे.




