33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय बडनेरामध्ये रंगणार रवी राणा व सेनेच्या प्रीती बंड मध्ये सामना

बडनेरामध्ये रंगणार रवी राणा व सेनेच्या प्रीती बंड मध्ये सामना

0
118

blank

अमरावती,दि.01 : युतीमध्ये बडनेरा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघात प्रीती संजय बंड यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा मुंबईत झाली.त्यामुळे या मतदारसंघात युवा स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष विद्यमान आमदार रवी राणा यांच्याशी सामना रंगणार आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवनित राणा याच मतदारसंघातून मागे होत्या,त्यामुळे या ठिकाणीच निवडणुक चुरशीची ठरणार आहे.राणा हॅट्रिक साधतात काय याकडे लक्ष लागणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी श्रीमती बंड यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म देण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.बडनेरा मतदारसंघात भाजप-सेनेकडून उमेदवारी मिळण्याकरिता इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती. भाजपद्वाराही मतदारसंघासाठी जोरकस दावा करण्यात आला. मात्र यात प्रीती बंड सरस ठरल्या. वलगाव मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेले संजय बंड यांच्या त्या पत्नी आहेत. वलगाव मतदारसंघ हा रद्दबातल झाला असला तरी या मतदारसंघाचा अर्धाअधिक भाग बडनेरा मतदारसंघात आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय बंड यांच्या अल्पशा मतांनी पराभव झाला होता. बंड यांच्या आकस्मिक निधनानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांद्वारे प्रीती बंड यांच्या उमेदवारीची मागणी सेनानेतृत्वाकडे केली होती.

blank