35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमांना गती द्या-दीपक कुमार मीना

‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमांना गती द्या-दीपक कुमार मीना

0
18
????????????????????????????????????

blank

  • ‘स्वीप’ समितीची आढावा बैठक
  • सर्व शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग आवश्यक
  • मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवा

वाशिम, दि. ०2 : मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकला, रांगोळी स्पर्धेत अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून मतदार जागृतीसाठी विविध संदेशांचे रेखाटन केले आहे. ‘स्वीप’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या इतरही उपक्रमांना गती देवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित ‘स्वीप’ समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे, ‘स्वीप’चे सहसमन्वय अधिकारी तथा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे, माविमचे जिल्हा समन्वयक राजेश नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री. मीना यावेळी म्हणाले, मतदार जागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती देवून मतदानासाठी येण्याचे आवाहन करावे. मतदार जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये सर्व विभागांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. तसेच या उपक्रमांमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी व्हावे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.श्री. राठोड यांनी यावेळी ‘स्वीप’ अंतर्गत येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

blank