30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गांधी जयंती निमित्ताने जिल्हा परीषदेत स्वच्छता दिन व मतदान शपथ कार्यक्रम

गांधी जयंती निमित्ताने जिल्हा परीषदेत स्वच्छता दिन व मतदान शपथ कार्यक्रम

0
31

गोंदिया दि.२ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिन व मतदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परीषद गोंदिया येथे करण्यात आले. यावेळी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहा. जिल्हाधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.इ.ए हाश्मी यांनी उपस्थित अधिकारी/ कर्मचाऱ्यांसोबत जिल्हा परीषद इमारतीच्या परीसरात स्वछता मोहीम राबविली. यावेळी एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिक चहा के कप, नास्ता प्लेट, चम्मच, प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक ग्लास इत्यादिचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, नरेश भांडारकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, सांख्यीकी अधिकारी वैशाली खोब्रागडे, आयटी विषय सहायक दिनेश उके, दिलीप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.