लाखनी: 2
जगद्गुरु नरेंद्र नाथ संप्रदाय यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निमित्ताने लाखणी रुग्णालय व व समर्थ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रुग्णालय लाखनी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ संजय पोहरकर, नगराध्यक्षा ज्योती निखाडे, माया निंबेकर, डॉ चंद्रकांत निंबारते, डॉ मनोज आगलावे, अजिंक्य भांडारकर, बाबुराव निखाडे, नगरसेवक ऍड कोमलदादा गभने, विक्रम रोडे, महेश आखरे, प्रा धनंजय गिर्हेपुंजे, डॉ बंडू चौधरी, डॉ दिगंबर कापसे, प्रा लालचंद मेश्राम, लेफ्टनंट बाळकृष्ण रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दरवर्षी दोन ऑक्टोबर हा महाराजांच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिराच्या निमित्ताने करण्यात येते याहीवर्षी लाखनी येथे 160 हून अधिक उपासक मंडळींनी आणि नागरिकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा सेवा अध्यक्ष मनोज तऱ्हेकर, जिल्हा कमांडर गोपाल माकडे, राजू फंडे, नागराज कोठेकर, विष्णुदास तळवेकर, आशा शहरे, अशोक गायधनी यांनी विशेष परिश्रम घेतले.




