30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ तिरोड्यात राष्ट्रवादीकडून रविकांत बोपचेंचा उमेदवारी अर्ज दाखल

तिरोड्यात राष्ट्रवादीकडून रविकांत बोपचेंचा उमेदवारी अर्ज दाखल

0
31

तिरोडा,दि.04ः-तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस रिपाई आघाडीचे अधिकृत उमेदवार रविकांत(गुड्डू)खुशाल बोपचे यांनी आपला उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केला.त्यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,तालुकाध्यक्ष प्रेम रहागंडाले,विनोद पटले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यापुर्वी प्रेमबंधन लाॅन येथे आयोजित सभेत राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,काँग्रेसचे नेते पी.जी.कटरे,सी.टी.चौधरी,जिब्राइल पठान,गायत्री साबड़े आदी उपस्थित होते.