वाशिम, दि. ०४ : विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून वापरात येणाऱ्या काळ्या पैशावर प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागाच्या अन्वेषण संचालनालयाच्या सुविधांचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार निवडणूक काळात उमेदवारांकडून वापरात येणाऱ्या पैशांवर आयकर विभागाची करडी नजर असणार आहे.
मुक्त व पारदर्शक वातावरणात विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी तसेच निवडणूक कालावधीत काळ्या पैशाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रधान आयकर निदेशक (अन्वेषण) नागपूर रोख व इतर मौल्यवान वस्तुंच्या देवाण-घेवाणीवर राज्य व इतर केंद्रीय विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात येणार आहे. याकरीता प्रधान आयकर निदेशक (अन्वेषण) नागपूर कार्यालयात विशेष कक्ष स्थापित करण्यात आला आहे. काळ्या पैशाच्या संदर्भात १८०० २३३ ३७८५ या टोल फ्री क्रमांक किंवा ९४०३३९१६६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रारी, माहिती देण्याचे किंवा कार्यालयीन ०७१२-२५२५८४४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन उप आयकर निदेशक (अन्वे.) (मुख्या.) कार्यालय प्रधान आयकर निदेशक (अन्वे.) नागपूर यांनी केले आहे.




