35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात शेवटच्या दिवशी 52 उमेदवारांकडून 74 अर्ज दाखल

जिल्ह्यात शेवटच्या दिवशी 52 उमेदवारांकडून 74 अर्ज दाखल

0
48

blank

आतापर्यंत 75 उमेदवारांकडून 115अर्ज दाखल
बुलडाणा, दि.5 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता जिल्ह्यात  4 ऑक्टोंबर 2019 रोजी जिल्ह्यात 66 उमेदवारांकडून 94 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये मलकापूर मतदार संघात 11 उमेदवारांनी 12 अर्ज, बुलडाणा येथून 4 उमेदवारांनी 12 अर्ज, चिखली येथून 10 उमेदवारांनी 15 अर्ज, सिंदखेड राजा येथे 17 उमेदवारांनी 22 अर्ज, मेहकर मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 9 अर्ज, खामगांवमधून 14 उमेदवारांनी 14 अर्ज आणि जळगांव जामोद येथे 10 उमेदवारांनी 18 दाखल झालेल्या अर्जांचा समोवश आहे. अशाप्रकारे 27 सप्टेंबरपासून ते आजपर्यंत मलकापूर मतदारसंघात 16 उमेदवारांनी 20 अर्ज, बुलडाणा येथे 8 उमेदवारांनी 19 अर्ज, चिखली मतदारसंघात 15 उमेदवारांनी 24 अर्ज, मेहकर मध्ये 9 उमेदवारांनी 13 अर्ज, खामगांवमध्ये 17 उमेदवारांनी 21 अर्ज आणि जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांनी 18 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 75 उमेदवारांकडून 115 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

21- मलकापूर मतदारसंघात प्रवीण रमेश गावंडे अपक्ष म्हणून, संजय पुंडलिक दाभाडे अपक्ष म्हणून, दत्ता गजानन येनकर यांनी अपक्ष म्हणून, चैनसुख मदनलाल संचेती यांनी भारतीय जनता पक्षाकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच अजय सिताराम भिडे यांनी अपक्ष म्हणून, अवकाश कैलास बोरसे यांनी अपक्ष म्हणून, अ. मजिद कुरेशी अ. कदीर यांनी एआयएमआयएम पक्षाकडून अर्ज दाखल केला. तर निळकंठ श्रीराम वाकोडे यांनी भारतीय जन सम्राट पक्षाकडून, राहुल शंकर खंडेराव यांनी बहुजन समाज पक्षाकडून आणि अनिल पंढरी जवरे यांनी एआयएमआयएम पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर केला. 22- बुलडाणा मतदारसंघात संजय रामभाऊ गायकवाड यांनी शिवसेना पक्षाकडून 4 अर्ज दाखल केले. मोहम्मद सज्जाद अब्दुल खालीक यांनी एआयएमआयएम पक्षाकडून 2 अर्ज, विजय रामकृष्ण काळे यांनी बसपाकडून, विजय हरीभाऊ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी व मनसे पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. तर रविंद्र राणू मिसाळ यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. 23- चिखली मतदारसंघात प्रशांत अविनाश डोंगरदिवे यांनी बसपाकडून 2 अर्ज व सौ श्वेता विद्याधर महाले यांनी भारतीय जनता पक्षाकडून 4 अर्ज दाखल केले. तसेच अब्दुल सलीम अब्दुल नूर मोहम्मद मेमन यांनी अपक्ष म्हणून, अशोक शिवसिंग सुरडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, परवीन सय्यद हारून यांनी बसपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राजेंद्र विश्वनाथ जवंजाळ यांनी अपक्ष म्हणून, शेख राजू शेख बुढन यांनी अपक्ष म्हणून, निसार अब्दुल कादर शेख यांनी अपक्ष व एआयएमआयएम पक्षाकडून आणि देवानंद पांडुरंग गवई यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. 24- सिंदखेड राजा मतदारसंघात तारामती बद्रीनाथ जायभाये यांनी अपक्ष म्हणून व प्रविण श्रीराम मोरे यांनी अपक्ष म्हणून 2 अर्ज दाखल केले. तसेच मनोज देवानंद कायंदे यांनी अपक्ष म्हणून, सौ सविता शिवाजी मुंढे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, समाधान त्र्यंबक जाधव यांनी बसपाकडून 2 अर्ज दाखल केले. तर विकास प्रकाश नांदवे यांनी अपक्ष म्हणून, भिमराव महादेव चाटे यांनी अपक्ष म्हणून, संगिता रघुनाथ मुंढे यांनी अपक्ष म्हणून राजेंद्र उत्तमराव शिंगणे यांनी अपक्ष म्हणून, सुनील गिनाजी इंगळे यांनी आरपीआय डेमोक्रेटीक पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. तसेच डॉ गणेश बाबुराव मांटे यांनी अपक्ष म्हणून, विनोद लक्ष्मण वाघ यांनी अपक्ष म्हणून, भागवत देविदास राठोड यांनी अपक्ष म्हणून, सय्यद मुस्ताकीन सय्यद रहीम यांनी इंडियन युनीयन मुस्लीम लीगकडून, डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 4 उमेदवारी अर्ज दाखल केले. एकनाथ नरेंद्र देशमुख यांनी अपक्ष म्हणून व श्रीकृष्णा उत्तम डोळस यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

25- मेहकर मतदारसंघात अनंता सखाराम वानखडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अर्ज दाखल केला. तसेच लक्ष्मण कृष्णाजी मानवतकर यांनी अपक्ष म्हणून व भाजपकडून अर्ज दाखल केला. तर विशाल अशोक वाकोडे यांनी बहुजन मुक्ती पार्टीकडून, अनिल देवराव खडसे यांनी बसपाकडून, आबाराव श्रीराम वाघ यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, समाधान देवराव साठे यांनी अपक्ष म्हणून, ओम श्रीराम भालेराव यांनी अपक्ष म्हणून आणि रेखा प्रतापसिंग बिबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 26- खामगांव मतदारसंघात कैलास वसंतराव फाटे यांनी स्वाभिमानी पक्षाकडून, रंजना श्रीकृष्णा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. गणेश जगन्नाथ चौकसे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, उद्धव ओंकार आटोळे यांनी अपक्ष म्हणून, दिलीप मनोहर भगत यांनी बसपाकडून, भिमराव हरीश्चंद्र गवई यांनी भिमराज सेना (अपक्ष) म्हणून, अजयतउल्लाखान रहेमतउल्लाखान यांनी अपक्ष म्हणून, आकाश देविदास गवई यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तसेच शब्बीरखा गुलशेरखा यांनी अपक्ष म्हणून अन्सारखॉ ईबराईमखा यांनी अपक्ष म्हणून, कैलास चंद्रभान शिरसाट यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आकाश पांडुरंग फुंडकर यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दाचाल केली. तर मोहम्मद अजहर मोहम्मद शौकत यांनी टिपू सुलतान पार्टीकडून अर्ज दाखल केला. 27- जळगांव जामोद मतदारसंघात डॉ. संजय श्रीराम कुटे यांनी भाजपाकडून 2 अर्ज दाखल केले. तसेच अपर्णा संजय कुटे यांनी भाजपकडून, संगीतराव भास्करराव भोंगळ यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केला. डॉ स्वाती संदीप वाकेकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून 4 अर्ज दाखल केले. तर पा्रशांत काशीराम डिक्कर यांनी अपक्ष म्हणनू दोन अर्ज, प्रसेनजित किसनराव तायडे यांनी अपक्ष म्हणून शेख मुस्ताक शेख दस्तगीर यांनी टिपू सुलतान पार्टीकडून अर्ज दाखल केला. अशाप्रकारे जिल्ह्यात आज 4 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी 52 उमेदवारांनी 74 अर्ज सादर केले, असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

blank