गोंदिया,दि.06ः- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाई(कवाडे) सयुंक्त आघाडीचे उमेदवार अमर प्रभाकर वराडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभेचे उमेदवार रविकांत खुशाल बोपचे,आमगाव-देवरीचे सहेसराम कोरेटी व अर्जुनी मोरगावचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रचारसभांच्या नियोजनाच्यादृष्टीने संयुक्त सभेचे आयोजन सोमवार 7 आक्टोंबरला सायकांळी 4 वाजता गोंदियातील प्रितम लाॅन येथे करण्यात आले आहे.या सभेत विशेष करुन गोंदियाचे उमेदवार अमर वराडे यांच्या प्रचारावर भर देण्यात येणार आहे.ओबीसी बहुजन समाजाच्या हक्कअधिकारासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून अमर वराडे यांची ओळख असून युवा काळापासून त्यांनी काँग्रेसकरीता निस्वार्थपणे काम केले.पक्षाने दिलेल्या कामाला स्विकारुन त्यांनी काँग्रेससाठी सतत काम केल्यानेच सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना पक्षाने गोंदिया विधानसभेच्या निवडणुक रिंगणात धनाढ्य गोपालदास अग्रवाल व भाजपचे बंडखोर विनोद अग्रवाल यांच्या विरोधात उतरविले आहे.त्यांच्याप्रचार नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल,काँग्रेसचे प्रचारप्रमुख व माजी खासदार नाना पटोले,काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,माजी आमदार राजेंद्र जैन,हरिहरभाई पटेल,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष एड.के.आर.शेंडे आदी मान्यवर या सभेला मार्गदर्शन करणार आहेत.त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस तसेच रिपाईच्या सर्व गोंदिया विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते,जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,सरपंच,उपसपंचासह सर्वांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदिया शहर काँग्रेस प्रभारी पृथ्वीपाल गुलाटी,गोंदिया ग्रामीण काँग्रेस प्रभारी दिलीप गौतम यांनी केले आहे.





