35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News ताडोब्यातील मीरा वाघीणीचा मृत्यू

ताडोब्यातील मीरा वाघीणीचा मृत्यू

0
26

चंद्रपूर,दि.07ः-ताडोबातील प्रसिद्ध माया वाघिणीचे अपत्य असलेली मीरा ही दोन वर्षांची वाघीण आज मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे मोठ्या प्राण्याची शिकार करताना शिंग लागले असावे, असा अंदाज ताडोबा व्यवस्थापणाने व्यक्त केला आहे.ल्या वर्षभरात माया वाघिणीने पर्यटकांना चांगलेच आकर्षित केले होते. तिची क्रेझ बघून ताडोबात तिची प्रतिकृती बसविण्यात आली आहे. याच माया वाघिणीचे मीरा अपत्य आहे. दोन वर्षांचीच असल्याने शिकारीचे तंत्र ती पूर्णपणे शिकलेली नसावी. त्यामुळे शिकार करताना प्राण्याचे शिंग लागून तिचा मृत्यू झाल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे

blank