33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ मतदारा तु जागा हो ! लोकशाहीचा धागा हो !

मतदारा तु जागा हो ! लोकशाहीचा धागा हो !

0
26

दिव्यांग ज्येष्ठ नागरिक व नवमतदारांकरीता स्वीप कार्यक्रमातून जनजागृती

भंडारा , दि. 7 – साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यात स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवून व्यापक जनजागृती केल्या जात आहे. मिरेगाव येथे मतदारा तु जागा हो, लोकशाहीचा धागा, हो मतदान करा ह अशा घोष वाक्यातून दिव्यांग नवमतदार व ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानाची व्यापक जनजागृती करुन आवाहन करण्यात आले.

तहसिलदार विराणी यांच्या मार्गदर्शनात लाखनी तालुक्यातील मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, मेंढा, पळसगाव, कोलारी निमगाव व कन्हाळगाव येथे नोडल अधिकारी नरेश नवघरे ग्रामसेवक भोतमांगे, मेश्राम, तलमले, गायधने, बारसे, नंदेश्वर यांच्या पथकाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदानाची जनजागृती करण्यात आली. नागरिकांना लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्व, ईव्हिएम व व्हिव्हिपॅटबाबत प्रात्यक्षिक तसेच दिव्यांग मतदारांकरीता मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मिरेगाव येथे मतदारा तु जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदान करा ह अशा स्वरुपाचे संदेश संदेश रांगोळी व रोपटे यांच्या माध्यमातून देवून मतदारांना आवाहन करण्यात आले. उपरोक्त गावात पार पडलेल्या जनजागृती कार्यक्रमालानागरिकांचा उर्त्स्फत प्रतिसाद मिळत आहे.

दिनांक 10 व 11 ऑक्टोबरला जनजागृती

दिनांक 10 ऑक्टोबरला गोंडेगाव, गुरठा, इसापूर, नेहारवाणी, मचारणा , कवडसी येथे दिवसभर स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांना जागृत केल्या जाणार आहे. 11 ऑक्टोबरला पोहरा, लाखोरी, गोंडसावरी, लाखनी, लाखनी शासकीय आयटीआय, येथे ग्रामपंचायत कार्यालयात  मतदान  जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

महिला शासकीय प्रशिक्षण संस्थेत मतदान जनजागृती

भंडारा  – येथील महिला शासकीय औद्योगिक संस्था व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विद्यार्थी व शिक्षकामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅटबाबत मार्गदर्शन करुन जनजागृतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ व तहसिदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनात मतदानाची जनजागृती करणाऱ्या पथकाने विद्यार्थी व शिक्षकांना ईव्हिएम व व्हिव्हिपॅट बाबत मार्गदर्शन केले. या मतदान यंत्राच्या माध्यमातून पारदर्शक मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच दिव्यांग मतदारांकरीता  असलेल्या साधन सुविधा या विषयी माहिती देण्यात आली. नवमतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करुन लोकशाहीला बळकट करावे, असे आवाहन करण्यात आले.

blank