गोंदिया,दि.9ः – महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे गोंदिया व भंडारा मंडळ कार्यालया अंतर्गत 11 ऑक्टोंबरला एकाच दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोंदिया मंडळातर्गत कर्मचारी वर्ग व त्यांच्या परिवाराकरिता महावितरण प्रशासकीय ईमारत, जुने पॉवर हाउस, राम नगर, गोंदिया येथे सकाळी 10 वाजेपासून भव्य रक्तदान व मोफत वैद्यकिय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उदय बहुउद्देशिय सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत “उदय आरोग्य सुरक्षा मोहीम”–व्यसनमुक्ती अभियानातंर्गत व्यसनमुक्ती या विषयावर सामाजिक कार्यकर्ते यशवंत लाकडे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. देवरी विभागातर्फे सडक अर्जुनी येथे एच. एन.टी. विद्याालय येथे 10 वाजेपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच भंडारा मंडळातर्गत कर्मचारी वर्ग व त्यांच्या परिवाराकरिता महावितरण लघु प्रशिक्षण केंद्र, विद्युत भवन, नागपूर रोड, भंडारा येथे सकाळी 10 वाजेपासुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आपले रक्तदान हे अनेकाचे जीवदान ठरू शकते त्यामुळे या पवित्र कार्यात मोठया प्रमाणावर कर्मचारी वर्ग व त्यांचा परिवार देखिल सहभागी होउन रक्तदान करावे, असे आवाहन महावितरण गोंदिया परिमंडळ कार्यालयाकडून करण्यात येत आहे.





