29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ खर्च निवडणूक निरिक्षक आर. मुकुंदन करणार निवडणूक खर्चाची तपासणी

खर्च निवडणूक निरिक्षक आर. मुकुंदन करणार निवडणूक खर्चाची तपासणी

0
44

गोंदिया दि. 9: भारत निवडणूक आयोगाने जिल्हातील आमगाव आणि गोंदिया या विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक आर. मुकुंदन (7820837431) हे या दोन्ही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक विषयक खर्चाची तपासणी करणार आहे. निवडणूक खर्चाच्या लेख्याची तपासणी व ताळमेळची तपासणी करणार आहे.श्री.मुकुंदन यांचे नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. आमगाव मतदारसंघासाठी 12 ऑक्टोबर – उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी,15 ऑक्‍टोबर-  उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची  दुसरी तपासणी, 19 ऑक्टोबर- उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची तिसरी तपासणी  या वेळापत्रकानुसार होणार आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी नोंदवही तपासणीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे 11 ऑक्टोबर – उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी,14 ऑक्‍टोबर-  उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची  दुसरी तपासणी, 18 ऑक्टोबर- उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची तिसरी तपासणी  या वेळापत्रकानुसार होणार आहे.दैनंदिन खर्च नोंदवही सर्व मुळ प्रमाणकासह तसेच निवडणूक खर्च नोंदवही उमेदवारांच्या स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे.विहित मुदतीत खर्च नोंदवह्या उमेदवाराने  स्वाक्षरीसह तपासणीस सादर न केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951चे कलम 10 नुसार पुढील कारवाई प्रस्तावित राहणार.