गोंदिया दि.10 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून 18 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एका मतदान यंत्राची क्षमता 16 उमेदवार इतकी आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघात 434 मतदार यंत्राचे यापूर्वी सरमिसळीकरण करण्यात आले होते. परंतु उमेदवार 16 पेक्षा जास्त असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर अतिरीक्त मतदान यंत्राची आवश्यकता पडणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रसारमाध्यम कक्षात संगणकाद्वारे 434 मतदान यंत्राचे पुरक सरमिसळीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, तहसिलदार राजेश भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मतदान यंत्राच्या पुरक सरळमिसळीकरणाच्यावेळी भाजपाचे प्रतिनिधी जयंत शुक्ला, श्री फुंडे, योगेश बन्सोड, कॉग्रेसचे विनोद जैन व बसपाचे दिशांत उके उपस्थित होते.




