अर्जुनी/मोरगाव, दि.10 : भारत निवडणूक आयोगाने अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक मंजूर अली यांनी अर्जुनी/मोरगाव येथे 9 ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी आयोजित केलेल्या विधानसभा मतदारसंघाअंतर्गत नियुक्त क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी आयोजित मतदान दिन देखरेख प्रणालीबाबत प्रशिक्षणाला भेट दिली. प्रशिक्षणानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सोनाले यांनी क्षेत्रीय अधिकारी यांचा आढावा घेवून मतदान केंद्रावरील सोयीसुविधा केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्यामार्फत मतदान चिठ्ठीवाटप आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सादर करावयाच्या अहवालाबाबत मार्गदर्शन केले.
निवडणूक निरीक्षक श्री मंजूर अली यांच्या उपस्थितीत अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार/निवडणूक प्रतिनिधी यांची मतदान यंत्र व व्हीव्ही पॅटचे द्वितीय सरळमिसळीकरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित उमेदवार/प्रतिनिधी यांना आचारसंहितेदरम्यान करावयाचे वर्तन, भ्रष्टाचार व निवडणूक विषयक अपराध, निवडणूकीची पत्रके, छापणे व प्रकाशित करणे यावर निर्बध, सामाजिक माध्यमांचा वापर, निवडणूक खर्च, मतदान प्रतिनिधींची नियुक्ती , अभिरुप मतदान व प्रचार कालावधी इत्यादीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.




