
गोंदिया,दि.11 : जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास काही राजकीय पक्षानी काही का असो वेळेवर का होईंना युवा चेहर्यांना संधी दिली आहे.त्या युवा उमेदवारांना नवमतदार हा कितपत स्विकारुन युवकांच्या आजावासाठी विधानसभेत पाठवितो की पारंपारिक पक्षाच्या भुमिकेवर ठाम राहून मतदान करतो हे 24 आक्टोबंरलाच कळणार आहे.या निवडणुकीत उमेदवाराचे भवितव्य निश्चित करण्यात तरुण मतदारांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया विधानसभा मतदारसंघात एैनवेळेवर काँग्रेसने उमेदवारी दिलेले अमर वराडे,युवा स्वाभीमानचे जितेश राणे,तिरोडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत(गुड्डू)बोपचे,बहुजन समात पार्टीचे कमल हटवार,अर्जुनी मोरगाव मतदारसंघात वंचितबहुजन आघाडीचे अजय लांजेवार यांचा युवा उमेदवार म्हणून नक्कीच विचार करावा लागणार आहे.भारतीय जनता पार्टी वगळता या सर्वच पक्षाने वेळेवर का होईंना युवा नेतृत्वाला संधी देण्याचे प्रयत्न केलेले आहेत हे मतदारांनाही नाकारता येणार आहे.त्यात हे युवा उमेदवार आपली छाप कशापध्दतीने मतदारावर पाडतात याकडे लक्ष लागले आहे.विशेष हे सर्व युवा उमेदवार वैचारिक पातळीवर सविंधानाशी बांधिलकी असणारे असून सामाजिक लढ्यात कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचा सहभाग राहिेलेला आहे हे सुध्दा नाकारता येणारे नाही.
राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना थेट राजकारणात संधी देण्याबाबत त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस गोंदिया,तिरोडा,अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात संबधित राजकीय पक्षाने दाखविले आहे. या युवा उमेदवारामुळे प्रचारात तरुण कार्यकर्ते, तरुण पदाधिकार्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. तरुणांचे शिक्षण, रोजगार आणि नोकरी या सर्व प्रश्नांना घेऊन हे उमेदवार आपला प्रचार गावखेड्यात करतांना दिसून येत आहेत.सोबतच सरकारच्या शिक्षणधोरणावर कडाडून हल्ला करीत आहेत.





