33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नागपूर विभाग पदविधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

नागपूर विभाग पदविधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

0
39

गडचिरोली, दि.11 : मा. भारत निवडणूक आयोगाने पदविधर मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबत सचना दिले आहेत. त्यानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील पदविधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनःरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला असुन नव्याने मतदार याद्या (De-Novo ) तयार करण्यात येत आहे. या करीता जाहीर सुचना दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 ला प्रसिध्द करण्यात आलेली आहे. पदविधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरीता नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतीम दिनांक 6 नोव्हेंबर 2019 हा आहे. तसेच प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दीचा दिनांक 23 नोव्हेंबर 2019 हा असून दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2019 हा आहे. अंतीम मतदार यादी दिनांक 30 डिसेंबर 2019 ला प्रसिध्द करण्यात येणार आहे.

पदविधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्यामुळे या मतदार संघातील सध्या अस्तीत्वात असलेल्या मतदार यादीत ज्या व्यक्तींची नावे समाविष्ठ आहेत अशा सर्व व्यक्तिंनी सुध्दा विहीत नमुन्यांत नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.

भारताचे नागरीक असलेल्या आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि तो 01 नोव्हेंबर 2019 पूर्वी किमान 3 वर्षे भारताच्या राज्य क्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदविधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादी मध्ये नांव समाविष्ठ करण्यास पात्र आहे. तरी जिल्ह्यातील पात्र पदविधर व्यक्तींनी नमुना 18 मधील अर्ज पदनिर्देशीत अधिकारी यांचे कडे मतदार यादीत नाव नोंदविण्याकरीता सादर करावेत असे आवाहन श्री. शेखर सिंह, जिल्हाधिकारी गडचिरोली तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केलेले आहे.

blank