37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आसामच्या मतिमंदाला केले कुटुंबियाच्या स्वाधीन

आसामच्या मतिमंदाला केले कुटुंबियाच्या स्वाधीन

0
50

गोंदिया,दि.12 : आसाम राज्यातील जलुकबारी येथील एक मतिमंद युवक ६ महिन्यापासून घरून निघाला होता. तो युवक ७ ऑक्टोबर रोजी दवनीवाडा पोलिस ठाणे हद्दीतिली धापेवाडा येथे फिरत असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो मुलगा मतीमंद असून आसाराम राज्यातील असल्याने समोर आले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबायाशी संपर्वâ साधला दरम्यान १० ऑक्टोबर रोजी त्या मतिमंद युवकाचे नातेवाईक दवनीवाडा पोलिस ठाण्यात आले व हा युवक आपलाच असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या समय सुचकतेने ६ महिन्यापासून हिरावलेला बादल क्रिष्णा चव्हाण (२५) हा मतीमंद युवक कुटुंबियांना मिळाला. आसाम राज्यातील जलकुबारी येथील बादल चव्हाण हा युवक मतिमंद असून मागील ६ महिन्यापासून तो हरवला होता. कुटुंबियांनी या काळात शोधा-शोध घेऊनही त्याच्या पत्ता लागत नव्हता. अशातच दवनीवाडा पोलिस ठाणे हद्दीतील धापेवाडा येथे ७ ऑक्टोबर रोजी हा युवक गावात फिरतांना दिसला. त्याच्या हालचालीवरून याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेऊन दवनीवाडा पोलिस ठाण्यात घेऊन गेले

blank