सडक अर्जुनी,दि.12 : १० वर्षांपूर्वीविकासापासून वंचित ठरत असलेल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आपले कसोसीचे प्रयत्न सु™ आहे. त्यातच आगामी काळात या क्षेत्रातील समाज व्यवस्थेतील शेवšच्या व्यक्तीचा विकास हेच आपले मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन इंजि.राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांनी (दि.११) प्रचार सभादरम्यान शेंडा परिसरातील नागरिकांशी संवाद साधला, याप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले, शेतकNयांना सबळ करण्यासाठी धानाला पाचशे रुपये बोनस, वनहक्क जमिनीचे पट्टे, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचे काम पुर्ण केले. कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळेल, याकरीता विशेष प्रयत्न करण्यात आले, शोषित वंचितांच्या शिक्षणाचा, विद्याथ्र्यांची वसतिगृहांची समस्या, विदेशातील शिक्षणाच्या समस्या प्रामुख्याने मार्गी लावणे, मतदार संघात जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, बचतगटाच्या माध्यमातून महिलाा सक्षमीकरणाचे कार्य पुर्ण केल्याचे इंजि.बडोले यांनी सांगितले. तसेच आगामी काळात क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी कृषी उत्पादनांवर आधारीत उद्योग प्रकल्प (राइस पार्क) पुर्णत्वास नेण्याचा उद्देश असून काही प्रलंबित राहिलेली कामे प्रामाणिकपणे पुर्ण करण्याची ग्वाही इंजि.बडोले यांनी दिली. उल्लेखनिय असे की, शेंडा व सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक सभा घेण्यात आल्यात. यावेळी शेंडा, सौंदड, राजगुडा परिसरातील विजय बिसेन, लक्ष्मीकांत धानगाये, गिरधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, हर्ष मोदी, शंकर खेकरे, डॉ.पšले, राजु पšले, पदमा परतेकी, कविता रंगारी, गिता šेंभरे, हितेश डोंगरे यांच्यासह बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





