अर्जुनी मोरदि. १२ : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जनता प्रेमळ व मायाळू आहे मतदारांच्या आशीर्वादाने आपण दोनदा या मतदारसंघाचे आमदार झालो व राज्याचे मंत्री म्हणून आपल्याला जी संधी मिळाली या मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने जनतेचा आशीर्वाद व प्रेम यांचे ऋण फेडण्यासाठी मतदारांनी पुन्हा आपल्याला संधी द्यावी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र माझे कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंबातील मी एक सदस्य आहे मला अमाप प्रेम मिळाला त्या प्रेमाचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे मतदार संघातील कुटुंबवात्सल्य टिकवून ठेवण्यासाठी मला संधी द्या असे आवाहन भाजपा-शिवसेना आरपीआय( आ) गट व मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार इंजिनीयर राजकुमार बडोले यांनी केली आहे
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ( दि. १२ : )विविध गावात आयोजित प्रचार सभेमध्ये राजकुमार बडोले बोलत होते सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावात आरती ओवाळून उमेदवार राजकुमार बडोले यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे सभेमध्ये महिला पुरुष व युवक युवती मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत आज तारीख 12 प्रचाराचे निमित्त अर्जुनी-मोर तालुक्यातील देऊळगाव, बोदरा, सोनेगाव ,तिडका, ताडगाव टोली ,झरपडा, बोडदे करड, धाबे टेकडि, बुधेवाडा, कन्हाळगाव, वडेगाव रेल्वे, ईटखेडा, इसापूर, खामखुरा, येगाव, जाणवा, हेटी, कोरंबी, अरुणनगर, आसोली, गौरनगर ,टोला, मांडोखाल, बोरी ,बंदया, महागाव येथे ढोल-ताशांच्या गजरात गावागावातून मिरवणूक काढून जनतेकडून मत रुपी आशीर्वाद मागण्यात आले या 26 गावातील सभांना मतदारांनी मोठी गर्दी केली होती ऊमेदवार राजकुमार बडोले यांचे सोबत रचना गहाणे, उमाकांत ढेंगे, सभापती अरविंद शिवणकर, नामदेव कापगते, रघुनाथ लांजेवार, लायकराम भेंडारकर, मंदा कुंभरे, कमल पाऊलझगडे ,रत्नाकर बोरकर, डॉक्टर गजानन डोंगरवार, भोजू लोगडे, व्यंकट खोब्रागडे, नूतन सोनवाने, विनोद नाकाडे, मीना शहारे, केवळराम पुस्तोडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मतदारांना मार्गदर्शन करताना राजकुमार बडोले म्हणाले की जनतेने मला दोनदा आमदार बनविले त्या संधीचे सोने करत आपण मतदार संघाचा चौफेर विकास केला मागील पाच वर्षात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात विकासाची अनेक कामे केली जलसंधारणाच्या माध्यमातून तलाव खोलीकरण याची कामे मृदसंधारण ची कामे मोठ्या प्रमाणात मजबूत रस्त्याची कामे हाती घेण्यात आली मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उज्वला गॅस घरा घरा पर्यंत पोहोचला सर्वांना विविध योजनेतून घरकुल ओबीसी बांधवांची क्रीमीलियरची मर्यादा वाढविली मंदिर मज्जित विहार यांचे सौंदर्य करण्यासाठी लाखोचा निधी आणून विकास केला चावडी समाज मंदिरे धार्मिक स्थळांना आवार भिंत यासारखे कामांना प्राधान्य देऊन विकास केला अनेकांना वस्तीगृहात प्रवेश मिळवून दिला दिव्यांगांना त्याचे हक्क मिळवून दिले निराधारांना सहाशे ऐवजी एक हजार रुपये मानधन देण्यात येत आहे भूमिधारी शेतकऱ्यांना भूमिस्वामी बनवून मालक केले वर्ग दोनची जमीन वर्ग-एक झाली कर्जमाफी व पाचशे रुपये बोनस ही सरकारची मोठी उपलब्धी आहे क्षेत्रात उद्योगाची स्थापना करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत राज्याचा मंत्री म्हणून आपण जी माझ्यावर जबाबदारी दिली त्याचे सार्थक म्हणून मी राज्यात महत्त्वाकांक्षी 64 महत्त्वपूर्ण विकासाचे निर्णय घेऊन सामाजिक न्याय विभाग काय असते हे महाराष्ट्राला दाखवून दिले लंडनचा घर असो चैत्यभूमीच्या जागेचा प्रश्न होतो आम्ही मार्गी लावला राज्यातील सर्व बौद्ध स्थळांना करोडोचा निधी देऊन सर्वांगीण विकास केला उर्वरित विकासासाठी परत एकदा अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील जनतेचा प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे तो आपण घ्या निश्चितच आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला उद्योग व विकसनशील क्षेत्र बनवू व त्याचा कायापालट करू असेही राजकुमार बडोले यांनी म्हटले आहे.





