25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home Top News फडणवीसावर मोदींनी उधळली स्तुतीसुमने,गोसेखुर्देसह भंडारा-गोंदियाचा विकास आम्हीच केला

फडणवीसावर मोदींनी उधळली स्तुतीसुमने,गोसेखुर्देसह भंडारा-गोंदियाचा विकास आम्हीच केला

0
30

साकोली,दि.13 -विधानसभेच्या निवडणुक प्रचाराच्या महाराष्ट्रातील दुसर्या सभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगावनंतर भंडारा जिल्ह्यातील साकोली येथेही आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करीत वैनगंगा व चुलबंद नदीचा उल्लेख केला.सोबतच यावर्षी चांगला धान पिक आला असून आमच्या महाराष्ट्रसरकारने बोनस दिल्याने त्याचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाष्ट्रातील दुसरी सभा रविवारी साकोली झाली.सभेत बोलताना मोदींनी प्रथम लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तोंड भरून कौतुक करत मोदी चक्क महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलले.आम्ही स्थिर सरकार दिले.फडणवीसांची स्तुती करण्यात मोदी मात्र कुठेच कमी पडले नाही.फडणवीस असे मुख्यमंत्री आहेत,त्यांनाच पुर्ण महाराष्ट्राची खरी जाण असल्याचे म्हणाले.जनकल्याण ते राष्ट्रनिर्माण भूमिका असल्याचे म्हणाले.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच वर्षातकिती काम झाले ते तुम्हालाच ठाऊक आहे.गोसेखुर्दचे काम आमच्याच काळात झाल्याचे मोदी म्हणाले.आमचे सरकार बाबासाहेबांचे विचार मानणारे असून बाबासाहेबांची इच्छा या मतदारसंघातून पुर्ण होईल असे म्हणाले.

मोदींनी आपल्या भाषणात आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्जला गॅस योजना, जनधन योजनांचा पाढा वाचून दाखवला. तसेच गरिबांसाठी काम करणारे हे सरकार आहे. या देशातील वंचित, पीडित, शोषित लोकं ही आमची कुटुंब आहेत, ते आमचेच लोकं आहेत. मोदींनी साकोली येथील भाषणात, आदिवासींचा विकास, शेती, शिक्षण, रस्तेविकास, आरोग्य, औद्योगिक आणि शेतकऱ्यांचा विकास यांसह अनेक प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, 2014 साली तुम्ही ट्रेलर दाखवला होता, आता पिच्चर दाखवा, असे म्हणत मोदींनी पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, यापूर्वी जळगाव येथील सभेत मोदींनी 370 चा मुद्दा उचलला होता. आमच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक नाही. जे सांगतो ते करतोच. जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविल्याने देशातील काही राजकीय नेते व पक्ष देश हिताच्या निर्णयावरून राजकारण करीत आहे.त्यांनी या व आगामी कोणत्याही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये 370 कलमचा उल्लेख करून दाखवावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले.