गोरेगाव,दि.१४ः अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आर पी आय (आ) महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांचा प्रचार दौरा मुंडिपार जिल्हा परिषद क्षेत्रात आयोजित करण्यात आला.यावेळी इंजि.बडोले यांचे जल्लोषात व उत्साहाने माता आणि भंगिनिनीद्वारे पुष्प व फुले देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी इंजि. बडोले मोहगाव/तिल्ली येथील प्रचारसभेत म्हणाले,गेल्या काळात सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणुन दिनदुबळया,शोषित,वंचित,ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,निराधार लोकांना न्याय देण्याचे कार्य केले.मतदार संघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,जलयुक्त शिवार,मुख्यमंत्री पेयजल योजना,दिव्यांगाना साहित्य वाटप,कामगार बांधवांना किट वाटप तसेच पाल्यांना व कुटुंबांना शैक्षणिक व आर्थिक लाभ अशा अनेक योजनाच्या माध्यमातुन सामान्य माणसांचा विकास साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. इंजि बडोले म्हणाले, होणा-या निवडणुकीत भाजप-सेना महायुतीचे सरकार येणार आहे.येत्या काळात क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत यासाठी आपण सर्वांनी सहकार्य व आशिर्वाद द्यावा असे म्हणाले.
यावेळी निंबा येथील २५ राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकत्र्यांनी भाजप प्रवेश केला.याप्रसंगी हेमंत पटले (भाजप अध्यक्ष गोंदिया जिल्हा),लक्ष्मण भगत (भाजप अध्यक्ष गोरेगाव),विश्वजित डोंगरे,दिलीप चौधरी,किशोर गौतम,झुम्मकभाऊ बिसेन,खोमेंद्र मेंढे,अशोक लंजे,नितीन कटरे,सुरेंद्र धमगाये यांच्यासह तालुका पदाधिकारी,बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख,,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





