30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ आज मतदार जागृतीसाठी मानवी शृंखला

आज मतदार जागृतीसाठी मानवी शृंखला

0
29

गोंदिया दि.16 येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.यादिवशी जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज 16 ऑक्‍टोबर रोजी मानवी शृंखलेचे आयोजन करण्यात आले आहे. मानवी शृंखलेची सुरुवात सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पतंगा मैदान येथून होईल.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे  ह्या मानवी शृंखलेला हिरवी झेंडी दाखवतील. ही मानवी शृंखला पतंगा मैदान, फुलचूर नाका, जुने आरटीओ ऑफिस, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, नेहरू चौक, एन.एम. डी. कॉलेज चौक, कुडवा नाका, गोंडीटोला, जबारटोला, पांढराबोडी,लईटोला, गिरोला, झिटाबोडी,निलज,दासगाव, मंडीयाटोला, तेढवा, मरारटोला ते काटी अशी 29 किलोमीटरची राहणार आहेत. या मानवी शृखलेमध्ये जवळपास 29 हजार विविध शाळांचे विद्यार्थी, बचत गटातील महिला आणि नागरिक सहभागी होणार आहेत. 29 किमी अंतरावर असलेल्या काटी येथे सकाळी 9.30 वाजता या मानवी शृंखलेचा समारोप  होईल. या समारोप कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, निवडणूक आयोगाचे जिल्ह्यातील चारही निवडणूक निरीक्षक उपस्थित राहणार आहे. तरी नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी श्री. हाश्मी व श्री. राजकुमार हिवारे यांनी केले आहे.