30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ वाचनप्रेरणा दिन साजरा

वाचनप्रेरणा दिन साजरा

0
40

लाखनी:16 स्थानिक लाखनी येथे विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी आणि राज्य मराठी विकास संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनप्रेरणा दिन साजरा करण्यात आला. वाचन संस्कृती जतन करण्यासाठी शासनाद्वारे उपक्रम राबविले जात आहे. सकाळी ८ वाजता विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ग्रंथप्रदर्शनी भरविण्यात आली. या ग्रंथपदर्शनीचे उद्घाटन पशुधन विकास अधिकारी डॉ गुणवंत भडके व साहित्याचे अभ्यासक बे तू आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. आज वाचनालय ८ तास सुरू ठेवण्यात आला असून वाचकांनी विविध ग्रंथांचे वाचन दिवसभर केले. दुपारी ३ वाजता अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आणि त्यांच्यावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच त्यांच्या पुस्तकांचे प्रकट वाचन अक्षय मासुरकर यांनी केले. तसेच काव्य गायनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

मोबाईल आणि समाजमाध्यमांचा होणार परिणाम यामुळे वाचन संस्कृती नष्ट होत आहे. यामुळे वाचाल तर वाचाल या युक्तीने या दिवसाला महत्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला डॉ गुणवंत भडके यांनी पुस्तके जीवनात किती आनंद निर्माण करून देतात ते स्पष्टपणे सांगितले. व्यक्तीच्या जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याला कुठल्याही क्षेत्रात प्रगती करायची असल्यास पुस्तकाशिवाय तरणोपाय नाही असे बोलत पुस्तके हेच गुरू असे ते बोलत होते. या कार्यक्रमाचे संचालन अक्षय मासुरकर यांनी तर आभार अजिंक्य भांडारकर यांनी व्यक्त केले.