
गोरेगाव,दि.१६ः भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आर पी आय (आ) महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांचे गावगावातील माता आणि भंगिनिनीद्वारे फुलाची उधळन करीत पुष्पगुच्छ देऊन व अब की बार हॅट्रीक पार, फिर एक बार राजकुमार अशा जयघोष करत उत्साहाने स्वागत करण्यात आले.आंबेतलाव येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी इंजि बडोले म्हणाले की,गेल्या पाच वर्षांत आम्ही सर्व समस्या निकाली लावल्या असा दावा मी करीत नाही. परंतु पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले. काँग्रेसच्या १५ वर्षांच्या काळात जेवढी कामे झाली, त्याच्या दुप्पट कामे पाच वर्षांत केली. वेगाने कामे करून महाराष्ट्र बदलण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली. प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न सुरू असून २०२२ पर्यंत एकही कुटुंब घराशिवाय राहणार नाही.यावेळी लक्ष्मण भगत (भाजप अध्यक्ष गोरेगाव),विश्वजित डोंगरे,दिलीप चौधरी,किशोर गौतम,झुम्मकभाऊ बिसेन,खोमेंद्र मेंढे,गिरधारी बघेले,नितीन कटरे,फलिंद्र पटले,मनोज बोपचे, यांच्यासह तालुका पदाधिकारी,बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख,,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




