35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गोंदिया व तिरोडात सकाळी 7 ते सायं 6 तर अर्जुनी/मोर व आमगावात...

गोंदिया व तिरोडात सकाळी 7 ते सायं 6 तर अर्जुनी/मोर व आमगावात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान

0
30

गोंदिया दि. 16 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये 63- अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघ, 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघ,65- गोंदिया विधानसभा मतदारसंघ, 66-आमगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्हयातील 63- अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघ आणि 66- आमगाव विधानसभा मतदारसंघ हे नक्क्षलग्रस्त भागामध्ये येत असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आहे. तर 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघ आणि 65- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत आहे.  या चारही विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदानाच्या वेळेची  नोंद घ्यावी. जास्तीत जास्त संख्येने 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.

आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी 56 पथके गठित

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम 21 सप्टेंबर रोजी घोषित केला. त्यादिवसा पासूनच जिल्हयातील चारही  विधानसभा मतदारसंघात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या आदर्श आचार संहितेची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 56 विविध पथके गठित करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातुन जिल्हयात निवडणूकीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4,  तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी 4, गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी 4 आणि आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4 अशी एकुण 16 भरारी पथके कार्यरत आहेत. तसेच अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4,  तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी 3, गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी 3 आणि आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4 अशी एकुण 14 स्थिर सर्वेक्षण पथके आहेत. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी 6,  तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी 1, गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी 7 आणि आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4 अशी एकुण 18 चित्रीकरण सर्वेक्षण पथके आहेत. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी 1,  तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी 1, गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी 1 आणि आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी 1 अशी एकुण 4 चित्रीकरण पाहणी पथके कार्यरत आहेत. तर चारही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी 1 असे एकुण 4 लेखा तपासणी पथक कार्यरत आहेत.

blank