27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ हिशोब तपासणी दरम्यान गैरहजर दोन उमेदवारांना नोटीस

हिशोब तपासणी दरम्यान गैरहजर दोन उमेदवारांना नोटीस

0
73

गोंदिया, दि.18 : भारत निवडणूक आयोगाने आमगांव आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून आर. मुकूंदन यांची नियुक्ती केली आहे. श्री मुकूंदन यांनी 15 ऑक्टोबर रोजी देवरी येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात आमगांव विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची लेखी तपासणी केली. यावेळी सात उमेदवार उपस्थित होते तर दोन उमेदवार खर्च तपासणीला गैरहजर होते. गैरहजर असलेल्या उमेदवारांना नोटीस देण्याचे निर्देश खर्च निवडणूक निरीक्षक यांनी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिले. नोटीस देवून गैरहजर उमेदवारांना आपले म्हणणे 48 तासाच्या आत सादर करण्याचे‍ सांगण्यात आले.

गोंदिया विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची लेखी तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात 14 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. यावेही निवडणूक निरीक्षक श्री मुकूंदन उपस्थित होते. खर्च तपासणीच्या वेळी सर्व 18 उमेदवारही उपस्थित होते. यावेळी सर्व उमेदवारांनी आतापर्यंत झालेला निवडणूक खर्च तपासणीसाठी सादर केला. सर्व उमेदवारांना निवडणूकीसाठी होणारा खर्च तपासणीसाठी सादर करणे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 च्या तरतुदीनूसार बंधनकारक आहे. अन्यथा उमेदवारावर कार्यवाहीची तरतुद आहे.