37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ निवडणूक खर्च निरीक्षक नरेंद्र सिंग यांची माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षाला...

निवडणूक खर्च निरीक्षक नरेंद्र सिंग यांची माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षाला भेट

0
18

वाशिम, दि. १8 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कक्षास निवडणूक खर्च निरीक्षक नरेंद्र सिंग यांनी , १७ ऑक्टोंबर रोजी भेट दिली. तसेच समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी तथा स्थानिक विकास निधीचे सहाय्यक संचालक संतोष कंदेवार, माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कक्षाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. सिंग यांनी वर्तमानपत्रातील जाहीरातीपेड न्यूजआकाशवाणीइलेक्ट्रॉनिक मिडीया व स्थानिक केबलवरील जाहिराती प्रमाणीकरण विषयी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण व खर्च नोंदणी, पेड न्यूजविषयक कामकाज काळजीपूर्वक करावे. सर्व प्रकारच्या माध्यमांतून प्रसारित जाहिरातींचे अवलोकन करून त्यावर त्याचा अहवाल निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाला सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. श्री. घोलप यांनी माध्यम कक्षमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीमार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

blank