30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ मैदानावर खेळाडूंना लोकशाही बळकटीकरणाचे धडे

मैदानावर खेळाडूंना लोकशाही बळकटीकरणाचे धडे

0
35

Ø  निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांचा मतदारांशी संवाद

Ø  मार्निग वॉकला येणाऱ्या नागरिक, खेळाडूंना मतदान करण्याचे आवाहन

भंडारादि. 19 :-  आपला देश हा लोकशाही प्रधान आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. या अधिकारातून नागरिकांना मतदानाद्वारे  आपला भविष्य घडविता येते त्यामुळे विधानसभा निवडणूकीत 21 ऑक्टोबरला आपल्या मतदानाचा वापर करुन लोकशाही बळकट करावी, असे धडे शिवाजी स्टेडियम येथील मैदानावर आज सकाळी निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांनी, खेळाडू, विद्यार्थी व नागरिकांशी बोलतांना दिले. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नावेश कपाटे यांची उपस्थिती होती.

21 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या मतदानाची व्यापक जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्यातर्फे  तीनही विधानसभा क्षेत्रात शंभर टक्के मतदान व्हावे, याकरीता विविध उपक्रम राबविण्यात  येत आहे. आता पर्यंत आयोजित जनजागृती कार्यक्रमाला निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांनी, उपस्थित राहून नवमतदार, दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना लोकशाही बळकट करण्यासाठी आवाहन केले आहे. आज शनिवारी शहरातील शिवाजी स्टेडियमवर निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांनी, सकाळी साडेसात वाजता हजेरी लावली. मैदानावर उपस्थित व्हॉलीबॉल खेळाडू, मार्निग वॉक करीता आलेले नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून लोकशाही बळकटीकरणासाठी धडे दिले.

प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.  या  अधिकारातून आपले भविष्य घडविणे व  लोकशाही बळकट करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. प्रत्येकांनी  आपल्या अधिकाराचा वापर करावा, असे आवाहन केले. व्हॉलीबाल खेळाडूंना लोकशाही मतदान प्रक्रिया, मतदानाचे महत्व यासह विविध मुद्यांवर संवाद साधून शंभर टक्के मतदान होण्यासाठी आग्रही राहावे, असे आवाहन केले. 21 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानात स्वत: सोबतच कुटूंबातील शेजारी, वार्ड व गावातील नागरिकांनी मतदान करावे या करीता खेळाडू व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

मतदानाकरीता विद्यार्थ्यांना कार्डचे वाटप

निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांच्याहस्ते मतदान जनजागृती करीता विद्यार्थ्यांना मतदान कार्डचे वितरण करण्यात आले. यापत्रात निवडणूकीत नव्या उमेदीने, निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्याच्या कार्यात सहभागी व्हा. लोकशाहीचे आधारस्तंभ व्हा, आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक निरिक्षकांनी  सकाळी मतदानासाठी संवाद साधल्याने खेळाडू, विद्यार्थी व नागरिकामध्ये मतदानाकरीता उत्साह दिसून आला.