30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ मतदानाच्या पूर्वतयारीचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

मतदानाच्या पूर्वतयारीचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

0
32

वाशिम, दि. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून मतदानासाठी आता काहीच तास शिल्ल्क्ल आहेत. या कालावधीत करावयाच्या उपाययोजना, मतदानाची पूर्वतयारी आणि कायदा व सुव्यवस्था विषयक बाबींचा आढावा सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू, कायदा व सुव्यवस्था (पोलीस) निवडणूक निरीक्षक मोहम्मद रहेमान, निवडणूक खर्च निरीक्षक नरेंद्र सिंग यांनी घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे, तहसीलदार तथा अधीक्षक प्रशांत जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. बिंदू म्हणाले, मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. तसेच मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकाऱ्यांना रवाना करण्यापूर्वी सर्व आवश्यक सूचना देण्यात याव्यात. मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचित करावे, असे त्यांनीसांगितले.श्री. रहेमान म्हणाले, मतदान केंद्र परिसरात तैनात करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगावे. तसेच मतदान केंद्रापासून १०० मीटर व २०० मीटर परिसरातील प्रवेशाबाबत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचना द्याव्यात.

श्री. सिंग म्हणाले, मतदानासाठी आता केवळ काही तासच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पथकांनी सतर्क रहावे. मतदारांना पैसे अथवा इतर भेटवस्तूंचे वाटप होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच स्थिर सर्वेक्षण पथकांनीही प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करावी. काही ठिकाणी अचानक तपासणी मोहीम उघडून वाहनांची तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.मतदान विषयक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थाविषयी विविध बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला.