36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय प्रचारातून उमेदवारांनी दाखवली जनशक्ती,पावसाच्या हजेरीने गोंधळ

प्रचारातून उमेदवारांनी दाखवली जनशक्ती,पावसाच्या हजेरीने गोंधळ

0
38

blank

गोंदिया,दि.19ः-जिल्ह्यातील 4 विधानसभामतदारसंघातील प्रचार आज संपला असून शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी शहरासह ग्रामीण भागात रॅली व पदयात्रा काढून प्रचाराचा समारोप केला.दरम्यान या पदयात्रेच्यावेळीच दुपारी 3 नतंर पावसाने हजेरी लावल्याने पदयात्रेत खोडा निर्माण झाला.गोंदिया शहरात भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल व काँग्रेसचे उमेदवार अमर वराडे यांची पदयात्रा शहरातील गुरुनानक गेट व जयंस्तंभ चौकात मागेपुढे येत असतानाच आलेल्या जोरदारपावसामुळे रॅलीत सहभागी लोकांची त्रेधातिरपट उडाली.वराडे यांनी ग्रामीण भागातही आज पदयात्रा काढून जनसंपर्क साधला.अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल व जितेश राणे यांनीही ग्रामीण भागात व शहरातील विविध प्रभागात पदयात्रा काढली.तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राष्टॅ्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघातील रावणवाडी येथे जाहिर सभेला संबोधून वंचित आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करीत भाजपसह काँग्रेसवरही टिका केली.blank
तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकांत बोपचे यांनी रॅलीतून शक्तीप्रदर्शन केले.हजारोच्या संख्येत रॅलीत मतदारांनी सहभाग नोंदविला.या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेससहरिपाईचे डाॅ.योगेंद्र भगत,अविनाश जायस्वाल,राधेलाल पटले,पंचम बिसेन,राजलक्ष्मी तुरकर,प्रेम रहागंडाले,कैलास पटले,मनोज डोंगरे,चेतना बोपचे,ममता बैस,चेतना पटले,रवी पटले,नितिन टेंभरे,अजय गौर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय रहागंडाले यांनीही शहरात रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले.यांच्या रॅलीत भाजप,शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अर्जुनी मोरगाव येथे -भारतीय जनता पार्टी,शिवसेना,आर पी आय (आ) व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ सडक अर्जुनी,कोहमारा,सौंदड,पळसगाव,राका, चिखली, नवेगाव बांध,उमरी,बाक्टी,चान्ना,बोडगाव/देवी,खांबी,निमगाव,अर्जुनी मोर येथे भव्य बाइक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी फिर एक बार राजकुमार,कहो दिल से राजकुमार बडोले फिर,अब की बार हॅट्रीक पार अशा घोषणा देत विधानसभा क्षेत्रातील युवा भाजप,शिवसेना,रिपाई  कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
blankसड़क/अर्जुनी तालुक्यातील शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावामध्ये, मोगरा/मंदिटोला/राजगुड़ा राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- आर.पी.आय – पिरीपा मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार  मनोहर चंद्रिकापुरे यांनी शेवटच्या दिवशी प्रचारयात्रा काढून जनसंपर्क साधला.त्यावेळी लेखलाल टेकाम, मोहन सूरसाऊत, फारुख शेख, पिंटू भीमटे, निशांत राऊत, रेहान शेख, फारुख शेख,विलास कापगते, हिरालाल डोंगरे, विठ्ठल कुंभरे, सूत्रधार मेश्राम, रामू मेश्राम, हिरालाल चौहान जी, कृष्णा ठलाल. अविनाश मेश्राम, चिमण मेश्राम, सरिता ताई कापगते, छाया ताई चौहान, रजनी ताई गिरेपूंजे, सशीकला ताई टेंभुर्णे, चंद्रप्रभा ताई मुनिश्वर, मेजू ताई राजानि, उषा बनसोड, या संख्येने् मतदार बंधु-भगीनी उपस्थित होते.

blank