30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात शांततेत मतदान,गोंदियात मतदारामध्ये उत्साह

गोंदिया जिल्ह्यात शांततेत मतदान,गोंदियात मतदारामध्ये उत्साह

0
36

गोंदिया,दि.२१ः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकरीता जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात आज मतदान शांततेत पार पडले.विशेष नक्षलग्रस्त भाग असलेल्या आमगाव व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातही ३ वाजेपर्यंत मतदारांनी उत्साहात मतदान केले.मतदानादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही.सकाळी पावसाने रिमझिम सुरवात केल्याने मतदानाला कमी प्रमाणात सुरवात झाली होती.मात्र त्यानंतर मतदानासाठी मतदार घराबाहेर पडले.विशेष म्हणजे जिल्ह्यातील गोंदिया विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून या मतदारसंघात ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या संख्येने मतदार यावेळी मतदानासाठी बाहेर पडले असून मतदान केंद्राबाहेर अपक्ष उमेदवाराच्याच नावाची जोरदार चर्चा एैकावयास मिळत होती.गोंदिया मतदारसंघात काही भागात तर काँग्रेससह भाजपलाही बुथ लावता आले नसल्याचे बघावयास दिसून आले.विद्यमान आमदार व भाजप उमेदवार गोपालदास अग्रवालांप्रती मतदारांमध्ये मतदानाच्यावेळी प्रचंड नाराजी असल्याचे चित्र होते.blank
राष्ट्रवादी काँग्रसेच्या प्रचाराची धुरा साभांळणारे नेते प्रफुल पटेल हे निवडणुक प्रचार सोडून मुंबईला इडीच्या तपासात गेल्याने मतदारसंघातील राष्ट्रवादीमध्ये थोडा उत्साह कमी झालेला होता.तो त्यांनी मतदानाच्या आदल्या रात्री जिल्ह्यात दाखल होऊन सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्यांची भेट घेऊन उत्साह वाढविल्याने तिरोडा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारीमध्ये व मतदारात उत्साह दिसून आला.
blankजिल्ह्यात पहिल्यांदा दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आलेला होता,त्यामध्ये सर्वच कर्मचारी हे दिव्यांग होते.तर ८ तालुक्यात ८ सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.त्यापैकी गोंदियातील मतदान केंद्र क्रमांक २३० मध्ये आकर्षक सुशोभीकरण करम्यात आले होते.
जिल्ह्यातील ६३ अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघा व ६६ आमगाव विधानसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.तर ६५ गोंदिया विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४६.३६ टक्के व ६४ तिरोडा विधानसभा मतदारसंघात ४७.८४ टक्के मतदान ३ वाजेपर्यंत पार पडले.

६६ आमगाव विधानसभा मतदारसंघात भावी आमदारकीचे स्वप्न रंगविणाèया उमेदवारांचे भाग्य सायंकाळी तीन वाजेनंतर मशिनबंद झाले आहे. या मतदार संघात सरासरी ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे वृत्त हाती येत आहे. दरम्यान काही तुरळक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने प्रत्यक्ष मतदानाला उशीरा सुरवात झाल्याचे वृत्त आहे. एकंदर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने निर्वाचन आयोगाच्या यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला.काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड आल्याने प्रत्यक्ष मतदानाला उशीरा सुरवात करण्यात आली. मात्र, अल्पावधीतच या त्रुट्या दूर करण्यात मतदान यंत्रणेला यश आले. या मतदार संघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून कॉंग्रेस आघाडीचे सहसराम कोरेटे आणि भाजपचे संजय पुराम यांच्यात थेट लढत असल्याचे मतदार संघात फेरफटका मारला असता दिसून आले. या रंगतीमध्ये माजी आमदार आणि कॉंग्रेसचे बंडखोर रामरतन राऊत यांनी कॉग्रेसपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. blankआज सायंकाळ पर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या प्रक्रियेत या मतदारसंघात सरासरी ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्षात हा आकडा वाढण्याची शक्यता निवडणुक अधिकाèयांनी व्यक्त केली आहे. मतदानाला सुरवात झाल्यापासूनच अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगाच्या रांगा दिसून आल्या. मात्र, सकाळी १० वाजे नंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी करीत लोकशाहीवर आपला विश्वास कायम असल्याचे जगाला दाखवून दिले. हा मतदार संघ अतिसंवेदनशील भागात मोडत असल्याने येथे सायंकाळी ३ वाजेनंतर मतदान बंद करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत चोख बंदोबस्त लावल्याने कोणताही अनुचित प्रकार या मतदार संघात घडला नाही.

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंगातील बंद्या गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाèयांना दिले होते.ठाणेदार महादेव तोंडले यांनी गावातील नागरिकांची मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले होते.त्यांच्या विनंतीला मान देऊन मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन उत्स्फूर्तपणे मतदान केले लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान मतदान आपला अधिकार आहे.