
वाशिम, दि. २२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील मतदान प्रक्रियेची पाहणी केली. तसेच दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला.वाशिम तालुक्यातील काटा येथील तीन मतदान केंद्र, कोंडाळा झामरे येथील दोन मतदान केंद्र, कार्ली येथील दोन मतदान केंद्र आणि किन्हीराजा येथील चार मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांना भेटी दिल्या. येथील क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. प्रत्येकाने आपल्या मतदान केंद्रावरील प्रत्येक दिव्यांग मतदाराचे मतदान होईल, यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.



