37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मतमोजणीनिमित्त रिसोड तहसील कार्यालय परिसरातील वाहतूक मार्गात बदल

मतमोजणीनिमित्त रिसोड तहसील कार्यालय परिसरातील वाहतूक मार्गात बदल

0
14

वाशिम, : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवार, २४ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८ वाजलेपासून सुरु होत असून रिसोड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी रिसोड येथील नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येथे होणार आहे. रिसोड तहसील कार्यालयाच्या डाव्या बाजूकडील सिव्हील लाईन रोड, साई हॉटेल बसस्थानक ते पेट्रोल पंपपर्यंत या मार्गावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ राहणार आहे. तसेच वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजलेपासून पेट्रोल पंपपासून लोणी रोडकडे जाणारा तसेच रिसोड ते लोणी रोड या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

blank