जळगाव,दि.24 : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या व मुक्ताईनगर मतदार संघातील भाजप उमेदवार अॅड. रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी १९८७ मतांनी पराभव केला.रोहिनी खडसे यांच्या पराभवामुळे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या विधानसभेमध्ये मंत्रीपद गमवावे लागले होते. यानंतर खडसे सत्ताकारणापासून बाजुलाच पडले होते. आता पराभवामुळे तर विधानसभेतील राजकीय अस्तित्वच संपुष्टात आले आहे.
शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर मुक्ताईनगरात राष्ट्रवादी व चंद्रकांत पाटील समर्थकांनी एकच जल्लोष सुरु केला आहे.भाजपाने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नव्हती. शेवटच्या यादीपर्यंत त्यांना वाट पहायला लावली होती. यानंतर भाजपाने रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिल्याचा गौप्यसोफोट केला होता. आजच्या निकालावेळी खडसे कन्या 500-1000 मतांच्या फरकाने पुढे मागे जात होत्या. मात्र, अखेर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळविला.





