29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home महाराष्ट्र काँग्रेसचे पटोले विजयी,मंत्री बोंडे पराभूत,कडू चौथ्यांदा,राणाची हॅट्रिक

काँग्रेसचे पटोले विजयी,मंत्री बोंडे पराभूत,कडू चौथ्यांदा,राणाची हॅट्रिक

0
25
  • BJP 98 , SS 59, NCP 55 , INC 43, OTH 33
  • विधानसभा निवडणुकीसाठी आज निकाल जाहीर होत आहे. या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच, बारामती , कर्जत-जामखेड, वरळी , सातारा, कणकवली अशा मतदारसंघांत चुरस असून, वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे.
  • सातारा लोकसभा पोटनिवडणूक: राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याकडून भाजपाच्या उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का.परळी : भाजपाच्या पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडून पराभवाचा धक्का, बहिण-भावाच्या लढतीत धनंजय मुंडे विजयी

    पुण्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे याचा पराभव केला.

    कणकवली – नितेश राणे विजयी , शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव

    कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार विजयी, भाजपाच्या राम शिंदे यांचा पराभव

    वरळीमधून आदित्या ठाकरे यांचा  70 हजार 191 मतांनी विजय

    बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधातील गोपीचंद पडळकर यांच्यासह सगळ्या उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त

    शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे- पाटील यांचा विजय तर पुण्यात मुक्ता टिळक विजयी

    सोलापूर शहर मध्य मतदारसंघ :  काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचा विजय, शिवसेनेचे दिलीप माने, अपक्ष महेश कोठे, MIM कडून फारुक शाब्दी आणि प्रणिती शिंदे या चारही उमेदवारांमध्ये झाली चुरशीची लढत.

    सावंतवाडी : सावंतवाडीतून शिवसेनेचे दिपक केसरकर विजयी, राष्ट्रवादीचे बबन साळगावकर व भाजपाचे बंडखोर उमेदवार राजन तेली यांचा पराभव

    गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकतर्फी विजयी आघाडी घेतली आहे. मंत्री महाजन यांनी 11 हजार मतांनी आघाडी घेतली असून संजय गरूड हे पिछाडीवर आहेत.

अर्जुनी मोरगावातून माजी मंत्री बडोलेंचा पराभव,राष्ट्रवादीचे चंद्रिकापुरे विजयी

आमगावमधून काँग्रेसचे सहसराम कोरेटी यांनी भाजप आमदार संजय पुरामचा पराभव केला

मेळघाट मधून प्रहार जनशक्तीचे उमेदवार राजकुमार पटेल विजयी

>> मोर्शीमधून राज्याचे कृषिमंत्री व भाजप उमेदवार अनिल बोन्डे पराभूत

>> अमरावतीः तिवसा मतदारसंघातील यशोमती ठाकूर ८ हजार १० मतांनी आघाडीवर.

>> अमरावतीः बडनेरा मतदार संघातून अपक्ष उमेदवार रवी राणा विजयी

>> नागपूरः साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले १२ हजार मतांनी विजयी.

>> अमरावतीः अचलपूरमधून बच्चू कडू चौथ्यांदा विजयी.

>> अमरावतीः राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे पराभवाच्या छायेत.मोर्शीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना १० हजार ६५२ मतांची आघाडी.

>> नागपुरात भाजपला दोन जागांवर काँग्रेसचा धक्का. पश्चिम नागपूरमध्ये सुधाकर देशमुख तर उत्तरमध्ये डॉ. मिलिंद माने यांचा पराभव.

>> भाजपला नागपुरात पहिला धक्का, पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी.

>> बुलडाणाः शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी. वंचितचा उमेदवार विजयराजे शिंदे दुसऱ्या नंबरवर.

>> नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस २० हजार मतांनी आघाडीवर

>> अमरावतीः तिवसा मतदारसंघात अकराव्या फेरीनंतर शिवसेनेचे राजेश वानखडे ४८७ मतांनी पिछाडीवर

>> वांद्रे पूर्व मतदारसंघातून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव

>> बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा १ लाख ६२ हजार मतांनी दणदणीत विजय

>> मुरबाड मतदारसंघ- किसन कथोरे यांचा १ लाख ७२ हजार मतांनी विजयी

>> वाशिम-कारंजा मतदारसंघातून भाजपचे राजेंद्र पाटणी २२ हजार विजयी

>> सातारच्या गादीची जर प्रतिष्ठा राखली गेली नाही, तर लोक काय भूमिका घेतात हे निवडणुकीत स्पष्ट झाले आहे- शरद पवार यांचा उदयनराजे भोसले यांना टोला

>> राज्यातील जनतेला पक्षांतरही पटलेले नाही- शरद पवार

>> सत्तेचा उन्माद लोकांना पटलेला नाही- शरद पवार यांची भारतीय जनता पक्षावर टीका

>> ‘२२० के पार’ हे जनतेने स्वीकारले नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया

>> नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस २० हजार मतांनी आघाडीवर

>> मतदारांनी दिलेला कौल मान्य असून परळीमधील निकाल मात्र अनाकलनीय आहे- पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

>> संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात ६१ हजार मतांनी विजय

>> वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मकरंद पाटील यांचा विजय