29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय आ. विनोद अग्रवाल गडकरी वाड्यावर तर आ.जायस्वाल व भोंडेकर मातोश्रीवर

आ. विनोद अग्रवाल गडकरी वाड्यावर तर आ.जायस्वाल व भोंडेकर मातोश्रीवर

0
52

गोंदिया,दि.26ः-विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी जागा वाटपावरुन युतीत निर्माण झालेला तिढा सोडविताना शिवसेनेला मन मोठे करुन कमी जागेवर समाधान मानावे लागले होते. युतीत नागपूरसह भंडारा, व नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला जागाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छूक असलेल्या शिवसैनिकांनी बंडखोरी करीत युतीविरुद्ध दंड थोपटले होते. त्यांना मतदारांनी त्यांना निवडून दिले.त्या बंडखोरांनी निकालानंतर आपपल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.blank

विशेष म्हणजे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या दिशेने मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. या अनुषंगाने 24 ऑक्टोबरला मध्यरात्री शिवसेना उपनेते अनिल देसाई विमानाने नागपुरात दाखल झाले.आणि रात्रीलाच रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल व भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याशी संपर्क साधून त्याच रात्री त्यांना सोबत मुंबईला नेले. दोघांनीही शुक्रवारी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद घेत आपण शिवसेनेसोबत असल्याची ग्वाही दिली.तर दुसरीकडे गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी केलेले विनोद अग्रवाल यांनी मताधिक्याने विजय प्राप्त केल्यानंतर दुसर्या दिवशी नागपूरात केंद्रीय मंत्री व माजी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांची वाड्यावर भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांची भेट अग्रवाल यांनी घेत आपण पक्षासोबत असल्याचे त्यांना आश्वस्त केल्याचे वृत्त आहे.त्यांच्यासोबत यावेळी महेश अग्रवाल,रोहीत अग्रवाल,कलाम शेख व इतर मंडळी उपस्थित होते.