आमगांव(पराग कटरे)दि.29: तालुक्यातील सुपलीपार येथील राजेश गजभिये यांनी दिवाळीच्या सणातच आपली आई व पत्नीची हत्या करून फरार झाल्याने घरातील इतर 3 लहान मुली या अनाथ झाल्या आहेत.आपल्या मुलांची कुठलाही विचार न करता केलेले कृत्य आणि त्या कृत्यानंतर वा-यावर मुलींना सोडण्यारी ह्रदय विकारक घटनेची माहीती आमगांव देवरी विधानसभेचे नवनिर्वाचीत आमदार सहषराम कोरोटे यांना मिळताच त्यांनी सुपलीपार येथील त्या घटनाग्रस्त कुटूंबातील मुलीना भेटण्यासाठी गावाला (ता.27)भेट दिली.त्या अल्पवयीन 3 मुलींच्या पालनपोषणासाठी लागणारे योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या भेटी दरम्यान गावातील शेतकरी लोकानी धान खरेदी केन्द्र त्वरीत सुरू करण्याचे आणि या भागात सिंचनाची सोय करून देण्याची मागणी केली.
यावेळी आमदार सहषराम कोरोटे यांनी सदर मागणी त्वरीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.




