40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय ‘निकोले व वनगा’ आहेत सर्वांत गरीब आमदार

‘निकोले व वनगा’ आहेत सर्वांत गरीब आमदार

0
42

पालघर,दि.30ः राज्यातील बहुतांश उमेदवारांची खासगी मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असली तरी त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार विनोद भिवा निकोले हे याला अपवाद आहेत. आमदार विनोद निकोले सर्वांत कमी श्रीमंत असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर दिसून येत आहे. तर शिवसेनेत मात्र सर्वांत गरीब आमदार पालघर विधानसभा मतदारसंघाचे श्रीनिवास वनगा ठरले आहेत. निकोले यांच्याकडे 51 हजार 82 रुपयांची रोकड असून, त्यांना राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचे घरही नसल्याचे समोर आले आहे. तर, श्रीनिवास वनगा माजी खासदार स्व. अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचे पुत्र असले तरी एक जातीवंत शेतकरी आहेत. वनगा यांच्याकडे 9 लाख सत्तर हजार 230 वारस प्राप्त मालमत्ता मिळून 34 लाख 60 हजार 333 इतकी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून स्वच्छ चारित्र्याचे असल्याचे समोर आले आहे. वनगा यांच्याकडे बँकेचे 11 लाख 21 हजार 385 इतके कर्ज असून त्यात चारचाकी (1) 6 लाख 85 हजार 498, सोने चांदी बाजार मूल्यानुसार 20 ग्रॅम 72 हजार, तर वनगा यांच्या सौभाग्यवतीकडे 30 ग्रॅम बाजारमूल्य 1 लाख 8 हजार याप्रमाणे पत्नी सुमन यांची जंगम मालमत्ता 8 लाख 46 हजार 123 रुपये आहे. त्यात स्थावर मालमत्ता 2 लाख 9 हजार इतकी असून त्यात सुमन यांचे बैंक व वित्तीय कर्ज 11 लाख 57 हजार 314 रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील हे दोन्ही आमदार गरीब असून त्यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकला आहे.निकोलेंचे मूळगाव डहाणू तालुक्यातील उर्से नावाचे खेडेगाव असून अतिशय गरीब कुटुंबात निकोले जन्माला आले आहेत. आई-वडिलांनी मोलमजुरी करुन विनोद यांना चांगले शिक्षण दिले. त्यांचे चौथीपर्यंतचं शिक्षण आशागड, तर पुढील शिक्षण कोसबाड आणि डहाणू इथे घेतले. मात्र पूर्वीपासून गरिबीत दिवस काढल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेताना सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी काम सुरुच ठेवले होते. त्याचप्रमाणे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा हे सुद्धा शिवसेनेचे सर्वात गरीब आमदार आहेत.श्रीनिवास यांना आई-वडिलांनी मोलमजुरी करुन शिकवले. वडील दिवंगत खासदार चिंतामण वनगा भाजपचे 3 वेळा खासदार, तर एकदा आमदार होते. वडील आमदार-खासदार असतानाही ते उत्कृष्ट शेतकरी म्हणून गणले जातात. पालघरच्या विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेतून भरघोस मतांनी निवडून आले आहेत.

blank